नाशिक (प्रतिनिधी) :चित्रकला आणि शिल्पकला हे देखील साहित्यच आहे. त्यामुळे त्याचा देखील आम्ही सन्मान करतो, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात “ऐसी अक्षरे” या कार्यक्रमात ते बोलत होते.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अच्युत पालव यांचे कॅलिग्राफी प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भेट देऊन छगन भुजबळ यांनी अच्युत पालव व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले आपल्या साहित्य संमेलनाचा परीघ ह्या वर्षी आपण वाढवला आहे. त्यात बालकवी कट्टा, चित्रकला, कॅलिग्राफी , शिल्पकला प्रदर्शनाचा कार्यक्रम देखील घेतला आहे. साहित्य आणि चित्रकलाही आपल्याला नेहमी विचार करायला भाग पाडतात आणि साहित्य, चित्रकलेतून मनात अनेक तरंग उठतात.
अच्युत पालव म्हणाले की, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात चित्रकलेला आदरपूर्वक सन्मान दिला याचा आनंद होत आहे.