जामनगर : भारतात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा तिसरा रुग्ण आढळला आहे. गुजरातमधील जामनगर येथील व्यक्ती ओमायक्रॉन बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा व्यक्ती दक्षिण आफ्रिकेतून परतला आहे. त्याचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याचे नमुने जीनोम सीक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आज आला असून त्यात त्याला ओमायक्रॉनची लागण झाली असल्याचे आढळून आले आहे. गुजरातच्या आरोग्य विभागाने सांगितले की, संक्रमित व्यक्ती झिम्बाब्वे येथून आली आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बाधित व्यक्तीचे वय ७२ वर्षे आहे. गुरुवारी त्याचा कोविड-१९ अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. गुजरातचे आरोग्य आयुक्त जय प्रकाश शिवहरे यांनी वृद्ध व्यक्तीला कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराची लागण झाल्याची माहिती दिली.