Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीशरद पवार यांच्या उपस्थितीत होणार संमेलनाचा समारोप

शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार संमेलनाचा समारोप

नाशिक:  कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे होत असलेल्या ९४ अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा समारोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्या ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक न्यायमूर्ती नरेंद्द चपळगावकर, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.

संमेलनाच्या अखेरच्या दिवशी खजूर गार्डन येथे सकाळी ९ वाजता बालसाहित्य समजून घेऊया बदलत्या काळातील बालसाहित्य संवाद

१० वाजता मुलांशी गप्पा गोष्टी (साहित्यिक प्रश्न)

१०.३० वाजता बालसाहित्य आणि मुलांच्या कल्पनाशक्तीचा विकास

११.३० वाजता खगोल ते भूगोल

दुपारी १२ वाजता कल्पनामधील नाविन्यता व विज्ञान

दुपारी १ वाजता बालसाहित्य समारोप कार्यक्रम

सकाळी ११ वाजता फार्मसी बिल्डिंग येथे

ऑनलाइन वाचन वाङ्ममय विकासाला तारक की मारक परिसंवाद

दुपारी १ वाजता इंजिनिअरिंग बिल्डिंग मध्ये

साहित्य निर्मितीची कार्यशाळा गरज की थोतांड परिसंवाद

रात्री ८ ते १० जय जय माय मराठी सांस्कृतिक कार्यक्रम

मुख्य मंडपतील कार्यक्रम

सकाळी ९.३० वाजता शेतकऱ्यांची दु:स्थिती, आंदोलने राजसत्तेचा निर्दयीपणा लेखक, कलावंतांचे मौन आणि सेलिब्रिटीची भूमिका या विषयावर परिसंवाद होणार आहे.

सकाळी ११.३० वाजता नाशिक जिल्ह्याची निर्मिती १५१ वर्षातील वाटचाल विकास आणि संकल्प परिसंवाद

दुपारी १.३० वाजता वृत्तमाध्यमांचे मनोरंजनीकरण परिसंवाद

सायंकाळी ४ वाजता समारोप कार्यक्रम

आदी कार्यक्रम संपन्न होणार असून नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -