Tuesday, April 29, 2025

महामुंबईताज्या घडामोडीपालघर

वसई-विरार मनपा क्षेत्रात कोरोना रुग्णसंख्येत वाढ

वसई-विरार मनपा क्षेत्रात कोरोना रुग्णसंख्येत वाढ

पालघर (प्रतिनिधी) : ‘ओमायक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर जिल्हा व मनपा प्रशासनाने विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने लसीचा साठाही मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात आला असून ज्यांनी अद्याप दुसरा डोस घेतला नाही, अशा नागरिकांनी त्वरित डोस घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

गेल्या दोन दिवसांत मनपा क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे प्रशासन सजग झाले आहे. गेल्या दोन दिवसांत मनपा क्षेत्रात सरासरी २५, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ८ रुग्ण सापडले आहेत. मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे प्रशासनाने खंबीर उपाय योजण्यास सुरुवात केली आहे. या अनुषंगाने, शहरी भागात मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

दरम्यान, ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटचा एकही रुग्ण नसला तरीही कोविड १९ च्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मनपा क्षेत्रात काल २८ रुग्ण सापडले होतर, तर २१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तसेच, दिवसभरात एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. आजच्या घडीला १५८ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.

Comments
Add Comment