मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेने २२१५७/२२१५८ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – चेन्नई एग्मोर त्रि-साप्ताहिक एक्स्प्रेसची फेऱ्यांत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दि. १२ डिसेंबर २०२१ पासून आणि चेन्नील एग्मोर येथून दि. १५ डिसेंबर २०२१ पासून वाढवून दैनिक करण्याचा निर्णय घेतला आहे.
या ट्रेनचे थांबे, वेळ आणि संरचनेत कोणताही बदल झालेला नाही. ट्रेन क्र. २२१५७ च्या वाढलेल्या वारंवारतेसाठी बुकिंग दि. ५ डिसेंबर २०२१ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर आरक्षण सुरू होईल. ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी, www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ शी संबंधित सर्व नियमांचे, एसओपींचे पालन करण्याचा सल्ला दिला जात आहे.