मुंबई (प्रतिनिधी) : बीडीडी चाळ सिलिंडर स्फोटातील जखमी चिमुकल्याचा नायर रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत आरोग्य समिती भाजप सदस्यांनी राजीनामे दिले. त्यानंतर शुक्रवारी झालेल्या महापालिका सभागृहात देखील याच मुद्द्याबाबत भाजप शिवसेना आमनेसामने आली. तर सभागृह संपल्यानंतर राणी बागेबाहेर गोंधळ घातला होता. या प्रकरणी गोंधळ घालणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप नगरसेविकांनी मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था, सहआयुक्त, विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन केली आहे.
यावेळी नगरसेविक रिटा मकवाना, राजेश्री शिरवडकर, समिता कांबळे, शीतल गंभीर, सारिका पवार, योगिता कोळी, जागृती पाटील, हेतल गाला, रेणू हंसराज, स्वप्ना म्हात्रे, आशा मराठे आदी नगरसेविका उपस्थित होत्या.