मुंबई: भारत विरुध्द न्यूझिलंडमध्ये पार पडत असलेला दुस-या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ विराट कोहलीच्या बाद होण्याने चांगलाच चर्चेत आला. मैदानावरील अम्पायरने विराटला बाद दिले पण विराटने लगेच डिआरएस घेतला. टिव्ही अम्पायर वीरेंद्र शर्मा यांनी अनेक वेळा रिप्ले पाहिला आणि त्यांनाही चेंडू आधी पॅडला लागलाय की बॅटला हेच स्पष्ट दिसले नाही.त्यामुळे त्यांनी मैदानावरील अम्पायरचा निर्णय कायम राखताना विराटला बाद दिले. यावेळी विरेंद्र शर्मा यांनी बॉल ट्रॅकींग डिव्हाईस न पाहताच विराटला बाद दिल्याचेही दिसले. खरंच चेंडू पहिला पॅडला लागला होता की नाही यावरून वाद सुरू झालाय.विराटनंही या निर्णयाची दाद मागितली अन पेव्हेलियनमध्ये जाऊन रिप्ले पाहून डोक्यावर हात मारला. नेटक-यांनी विराटला बाद करण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केलीय.
भारत न्यूझीलंड दुस-या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ १२ वाजता सुरू झाला. मयांक अग्रवाल व शुबमन गिल यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा संयमानं सामना करताना अर्धशतकी भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण २८ व्या षटकाच्या तिस-या चेंडूवर पटेलनं टीम इंडियाला पहिला धक्का दिला.गिल ७१ चेंडूत ७ चौकार व १ षटकारासह ४४ धावांवर झेलबाद झला. त्यानंतर लगेच पुजारा आणि विराटची विकेट गेली. विराटच्या विकेटने क्रिकेटच्या चाहत्यांना धक्का बसलाय.
या मॅचमध्ये विराट शुन्यावर बाद झाल्याने भारतीय कर्णधार शून्यावर बाद होण्याचा मन्सूर अली खान यांचा विक्रम विराटने मोडला आहे.मन्सूर अली खान पाच वेळा शून्यावर बाद झाले होते तर विराट आजच्या सामनात शून्यावर बाद झाल्याने सहा वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम त्याने केला आहे.