राजापूर (प्रतिनिधी) :केळवली जिल्हा परिषद गटातील तळगाव भागातील शिवसेनेच्या मुस्लीम कार्यकर्त्यांसह या भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी बुधवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.काही दिवसांपूर्वी सागवे विभागातील शिवसेना व काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचे प्रदेश सचिव आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला होता. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेशाचा हा सिलसीला सुरूच आहे.
भाजप तालुका अध्यक्ष अभिजित गुरव यांच्या नेतृत्वाखाली या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. केळवली जिल्हापरिषद गटातील तळगाव येथील रिजवान रशिद मालीम, नजीर अ. रजाक मालीम, बशीर अ. रजाक मालीम, अकबर रहीम मालीम, पांडुरंग काशिराम राणे, वजीर महमंद मालीम, अमान बशीर मालीम, रशिद रज्जाक मालीम, शंकर घडशी, राजन ढिपले, दिलीप राणे, बाळू राणे, अनिल तेरवकर, नामदेव राणे, जितेंद्र राणे, महमद नझीर मालीम, साद नझीर मालीम, दिनराट टिवले, धोंडू ढिपले, रशीव काझी, विलास तावडे, भूषण सावंत, प्रकाश ढिपले, काशिराम राणे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप तालुका अध्यक्ष अभिजित गुरव यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
या प्रसंगी भाजपचे तालुका सरचिटणीस मोहन घुमे, संदेश विचारे, जिलानी काझी, दिलीप पवार, प्रतिक निकम आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.