Thursday, July 10, 2025

राज ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढणार

राज ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढणार


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आगामी महापालिका निवडणुका सर्व ताकदीनिशी लढविण्याच्या प्रक्रियेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी राज्यव्यापी दौरा करणार आहेत.


राज ठाकरे यांनी शुक्रवारी आपल्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले.


येत्या सहा तारखेला ते पुण्यात जाणार असून १४ डिसेंबरपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर असतील, असे नांदगावकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment