मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेच्या शताब्दी एक्स्प्रेस आणि दुरंतो एक्स्प्रेस ट्रेनमध्ये तयार केलेल्या जेवणासह तेथे खाण्याची सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार ट्रेन नंबर १२००९/१० मुंबई सेंट्रल-अहमदाबाद-मुंबई सेंट्रल शताब्दी एक्सप्रेस आणि ट्रेन नंबर २२२०९/१० मुंबई सेंट्रल-नई दिल्ली – मुंबई सेंट्रल दुरंतो एक्स्प्रेसमध्ये १० डिसेंबर २०२१ पासून ऑन-बोर्ड कॅटरिंग सेवा सुरू केली जात आहे. १० डिसेंबर २०२१ पासून सुरू होणाऱ्या या ट्रेनच्या प्रवाशांना या जेवणाच्या सेवांचा लाभ घेण्याचा अथवा न घेण्याचा पर्याय दिला आहे.