मुंबई (प्रतिनिधी) : वरळी बीडीडी चाळीतील सिलिंडर स्फोटात जखमी चिमुकल्याचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. नायर रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत भाजपने पालिका प्रशासन, सत्ताधारी आणि नायर रुग्णालयातील डॉक्टरांच्या उदासीन कृतीचा निषेध करत स्थायी समितीची सभा तहकुबी मांडली होती. त्यानुसार शुक्रवारी सभा तहकूब झाली.
वरळी बीडीडी चाळीतील एका घरात मंगळवार ३० नोव्हेंबर रोजी सकाळी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात चार महिन्यांच्या बाळासह पाच वर्षे वयाचा मुलगा, एक महिला आणि एक पुरुष असे चौघे जण जखमी झाले. या चारही जखमींना नायर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र नायर रुग्णालय प्रशासनाच्या, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बालकाचा मृत्यू झाला. या प्रकाराचा निषेध करत भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी तहकूबी मांडली होती. याबाबत भाजपकडून पत्रदेखील काढण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारची सभा तहकूब झाली. दरम्यान सभा तहकूब करतानासुद्धा सत्ताधारी शिवसेनेने श्रेयवादाची लढाई लढली असल्याचा आरोप प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.