अंबरनाथ : अंबरनाथ शहरात आपल्या कुटुंबासह विदेशात जाऊन परत आलेल्या एका सात वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही मुलगी आपल्या आई-वडिलांसह रशियात फिरायला गेली होती. रशियातून हे कुटुंब २८ नोव्हेंबर या दिवशी अंबरनाथला परत आले.
मात्र, काही दिवसांनी मुलीला कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. तिची कोरोना चाचणी केल्यानंतर तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मात्र, मुलीच्या वडिलांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून तिच्या आईचा रिपोर्ट मात्र अजूनही आलेला नाही.