मुंबई : परदेशातून आलेल्या ९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या ९ जणांपैकी ७ जणांना ओमायक्रॉनची लागण असण्याची शक्यता आहे. या सात जणांची एसजीन चाचणी नकारात्मक आली आहे. या बाधीतांना गंभीर लक्षणे नसून त्यांना मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ओमायक्रॉन या विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकरकडून सूचना आल्यानंतर मुंबईतील ९ प्रवासी कोविड बाधित आढळले आहेत. यातील एक प्रवासी डोंबीवली येथील रहिवाशी आहे. या बाधीतांच्या कोविड व्हेरीएंटची तपासणी करण्यासाठी त्यांच्या नमुन्यांची जनुकिय चाचणी करण्यात येत आहे. या आधी महापालिकेकडून या नऊ जणांच्या नमुन्यांची एसजीन चाचणी केली होती. त्यातील सात जणांचे अहवाल नकारात्मक आले असल्याचे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे. दरम्यान या सर्व बाधीतांवर मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या सर्व कोविड केंद्रात स्वतंत्र कक्ष तयार केला जाणार आहे. तसेच खासगी रुग्णालयात देखील स्वतंत्र कक्ष तयार करण्याची शिफारस करण्यात आली असल्याचे काकाणी यांनी सांगितले.