मुंबई : सिटी सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यापूर्वीही मुंबईत विशेष पीएमएलए न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला होता.
अडसूळ सिटी सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना खातेधारकांचे पैसे बेकायदेशीरपणे बांधकाम व्यावसायिकांना देण्यात आले. त्यात सुमारे नऊशे कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला, अशी तक्रार आमदार रवी राणा यांनी केली होती. त्यानंतर ईडीकडून अडसूळ यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. ईडीने त्यांच्या कार्यालयावरही छापेमारी केली होती. अडसूळ यांना दुसऱ्यांदा समन्स आल्यानंतर ईडीचे अधिकारी घरी आले असताना त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अटकपूर्व जामीनासाठी त्यांनी अर्ज केला होता. मात्र, मुंबईतील विशेष मुंबईत विशेष पीएमएलए न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला होता.
अडसूळ यांनी अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. मात्र, न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.