मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दि. ६ डिसेंबर (५/६ डिसेंबर २०२१ च्या मध्यरात्री) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -पनवेल स्थानकांदरम्यान मध्य रेल्वे प्रवाशांकरीता ८ उपनगरीय विशेष गाड्या चालवणार आहे. या उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील.
मेन लाईनवर अप विशेष कल्याण- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – विशेष कल्याण येथून रात्री ०१.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रात्री २.३० वाजता पोहोचेल. कल्याण- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष कल्याण येथून रात्री ०२.१५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पहाटे ०३.४५ वाजता पोहोचेल.
मेन लाईनवर डाउन विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री ०१.३० वाजता सुटेल आणि कल्याण येथे रात्री ०३.०० वाजता पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री ०२.३० वाजता सुटेल आणि कल्याण येथे पहाटे ०४.०० वाजता पोहोचेल.
हार्बर लाइनवर अप विशेष पनवेल- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष पनवेल येथून रात्री ०१.१५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रात्री ०२.३५ वाजता पोहोचेल. पनवेल- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष पनवेल येथून रात्री ०२.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पहाटे ०३.५० वाजता पोहोचेल.
हार्बर लाइनवर डाउन विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री ०१.४० वाजता सुटेल आणि पनवेल येथे रात्री ०३.०० वाजता पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री ०२.४० वाजता सुटेल आणि पनवेल येथे पहाटे ०४.०० वाजता पोहोचेल.