नवी दिल्ली : कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी देशातील कोरोनाच्या स्थितीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी केरळ आणि महाराष्ट्रात सध्या १० हजार अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती देण्यात आली. तसेच देशातील एकूण कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांपैकी ५५ टक्के रुग्ण या दोन्ही राज्यांमध्ये असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली.
अग्रवाल म्हणाले, देशात दुसऱ्या डोससाठी लसीकरणात वाढ करण्यात आली आहे. देशभरात लसीकरण वाढावे यासाठी विविध कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. युरोपमध्ये कोविड केसेसमध्ये वाढ होत असून इथेच जगभरातील ७० टक्के कोरोनाच्या प्रकरणांची नोंद झाली आहे.
या तुलनेत दक्षिणपूर्व आशियामध्ये भारतासह इतर अकरा देशांमध्ये गेल्या आठवड्यात केवळ १.२ लाख कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली. ही संख्या जगातील एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येच्या ३.१ टक्के आहे. म्हणजेच आशियातील या भागात कोरोनाच्या संसर्गात घट झाली आहे.
युरोपात गेल्या आठवड्याच्या शेवटी म्हणजे २८ नोव्हेंबर रोजी २.७५ लाख नवे केसेस आणि ३१,००० हून अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे, असेही यावेळी लव अग्रवाल यांनी सांगितले.
मुंबई : पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५० लाख…
मुंबई : प्रेक्षकांना नेहमीच मनोरंजनासाठी चटपटीत मसालेदार कंटेन्ट हवा असतो. या स्पर्धेत मराठी चित्रपटांनी सगळ्याच…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार हाय अलर्ट मोडवर आहे. सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये…
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी २६ जणांची हत्या केली. नाव आणि धर्म विचारुन…
महिलांना किंवा मुलींना ब्लाऊजचे नवीन नवीन पॅटर्न शिवण्याची खूप आवड असते. कोणत्याही समारंभात साडी नवीन…
मुंबई : वांद्रे येथे लिंकिंग रोडवरील लिंक स्क्वेअर मॉलमध्ये असलेल्या क्रोमा शो रूमला आग लागली.…