नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्र सरकार आणि राज्यांनी कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिअंटला रोखण्याचे जिकिरीचे प्रयत्न करूनही ओमायक्रॉन भारतात दाखल झाला आहे. ओमायक्रॉन विषाणूचे दोन रुग्ण कर्नाटकमध्ये आढळून आले आहेत.
https://twitter.com/ANI/status/1466362949006626821?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1466362949006626821%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fdesh%2Fomicron-variant-entered-in-india-two-patient-found-in-karnataka-shk99कर्नाटकमध्ये साऊथ आफ्रिकेतून आलेले ६६ वर्षीय आणि ४६ वर्षीय अशा दोन पुरुष प्रवाशांना कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटची लागण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दिलेल्या माहितीमुळे काहीशी चिंता वाढली आहे. अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार ओमायक्रॉन भारतात दाखल झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाने या संबंधित माहिती देताना अग्रवाल यांनी सांगितले की, ओमायक्रॉनशी संबंधित दोन्ही रुग्णांमध्ये आतापर्यंत सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. ओमायक्रॉनने बाधित झालेल्या रुग्णांच्या संपर्कातील सर्वांची ओळख पटली असून त्यांच्या आरोग्यावर डॉक्टरांचे लक्ष असणार आहे. तसेच सर्व बाबींमध्ये प्रोटोकॉलचे पालन केले जात आहे, असे अग्रवाल म्हणाले.






