मुंबई : नुकतीच फॉर्चून इंडियाने भारतातील ५० शक्तिशाली महिलांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार, भारतातील सर्वात प्रभावशाली महिलांमध्ये देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण या अग्रस्थानी आहेत. त्यानंतर रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक नीता अंबानी आणि तिसऱ्या स्थानी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आहे.
या यादीत ईशा अंबानीचेही नाव आहे. रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलची डायरेक्टर ईशा ही सर्वात तरुण प्रभावशाली महिला आहे. तिचे वय फक्त ३० वर्षे आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मार्च २०२० मध्ये टाळेबंदी लागू झाल्यानंतर ३६ तासांनी पत्रकार परिषद घेतली होती. अशी पत्रकार परिषद घेणाऱ्या त्या पहिल्या केंद्रीय मंत्री आहेत.
तसेच त्यावेळी संपूर्ण देशाला कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी आणि अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सरकारच्या योजनांबद्दल जाणून घ्यायचे होते. त्या भयंकर काळात त्यांनी अर्थमंत्री म्हणून आपली जबाबदारी चोख पार पाडली, असे फाॅर्चून इंडियाने निर्मला सीतारामण यांच्याबद्दल सांगितले आहे.
मुंबई : वांद्रे येथे लिंकिंग रोडवरील लिंक स्क्वेअर मॉलमध्ये असलेल्या क्रोमा शो रूमला आग लागली.…
नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचेंद्र कुमार निवृत्त होत आहेत. यामुळे भारताच्या नॉर्दन आर्मी…
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांची मागणी मुंबई : किनारपट्टीवर राहत असलेल्या मच्छीमार समाजावर…
नवी दिल्ली : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने तातडीने संरक्षणाशी संबंधित अनेक निर्णय घेतले आहेत.…
संयुक्त राष्ट्रे : अमेरिका, ब्रिटनसह पश्चिमेकडील देशांसाठी मागील तीन दशकांपासून दहशतवादाला खतपाणी घालण्याचे घाणेरडे काम…
मुंबई(ज्ञानेश सावंत):अठराव्या हंगामातील पात्रता फेरीतील चढाओढ सध्या सुरू आहे. प्रत्येक संघ पात्रता फेरीतील आपले स्थान…