अवकाळीने आणले डोळ्यांत पाणी

  53

वाडा (वार्ताहर) : तालुक्यात बुधवारी संपूर्ण दिवसभर आणि रात्री जोरदार अवकाळी पाऊस पडल्याने संपूर्ण शेतीत पाणीच पाणी झाले. नियमित पावसाळ्यासारखे पाणी शेतांतून वाहू लागले आहे. या पावसामुळे भातपीकाबरोबर रब्बी पिकांसह भाजीपाला, कलिंगड, वीट उत्पादक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे .प्रशासनाने नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून त्वरित पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, गुरुवारीही पावसाची रिमझिम सुरूच राहिल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे.

वाड्यात रब्बी हंगामात वाल, हरभरा, मूग, तूर, तीळ, भाजीपाला, कलिंगड, सूर्यफूल या पिकांचे उत्पादन घेतले जाते. शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची पेरणीही केली आहे. शेत मात्र पूर्णपणे पाण्याने भरल्याने बियाणे कुजून वाया जाण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

तालुक्यातील सागे येथील शेतकरी अनिल पाटील यांनी चार दिवसांपूर्वी दोन एकर जागेत आधुनिक पद्धतीने कलिंगडची लागवड केली आहे. या संपूर्ण शेतीमध्ये पाणी भरल्याने बियाणे कुजून वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच, बोरांडा येथीलही एका शेतकऱ्याने पावणेदोन एकरावर कलिंगडची लागवड केली होती. त्यांचीही शेती पाण्यात भरल्याने कलिंगडाचे बियाणे कुजून वाया जाण्याची शक्यता आहे.


बळीराजाचे सर्व कष्ट पाण्यात


जामघर येथील एका शेतकऱ्याने २०० भाऱ्यांची कापणी केलेली भाताची करपे पाण्यात वाहून गेल्याने आता वर्षभर खायचे काय?, असा प्रश्न या शेतकऱ्याला पडला आहे. वर्षभर काबाडकष्ट केले, पण हे कष्ट अवकाळी पावसाने व्यर्थ घालवल्याने शेतकरी मात्र मेटाकुटीस आले आहेत.

आतापर्यंत कोणत्याही वर्षी अशी नैसर्गिक आपत्ती ओढावली नव्हती. कोरोना काळातही कलिंगडचे उत्पादन घेतले; परंतु या अवकाळी पावसामुळे माझी कलिंगडची संपूर्ण शेती वाया जाईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.- समीर कवळे, शेतकरी, बोरांडा

वरिष्ठांकडून आदेश येताच शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी करून पंचनामे करण्यास सुरुवात होईल. - सुनिल लहांगे, नायब तहसीलदार, वाडा

शेतात कापून ठेवलेले भातपिक अवकाळी पावसाच्या पुरात वाहून गेल्याने वर्षभराच्या खावटीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
- रामचंद्र गोळे, शेतकरी, जामघर
Comments
Add Comment

मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान छगन भुजबळ अ‍ॅक्शन मोडवर, ओबीसी नेत्यांसोबत आज घेणार महत्वपूर्ण निर्णय

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारचे

Maratha Reservation : मराठा आरक्षण मुद्यावर मध्यरात्री 'वर्षा' बंगल्यावर खलबत! मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत महत्वाची बैठक

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील आजपासून मुंबईच्या आझाद मैदानावर कडक आमरण उपोषणाला बसणार

ग्रामीण भागातील प्रत्येक रस्त्याला विशिष्ट क्रमांक

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाकांक्षी निर्णय ग्रामीण रस्ते होणार अतिक्रमणमुक्त ! मुंबई :

लालबागच्या राजाचे VIP दर्शन वादाच्या भोवऱ्यात! जनसामान्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप

मुंबई: संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून, राज्यभरातून अनेक लोकं या दिवसात मुंबईत लालबागच्या

आता आणखी किती दिवस?' ऋषभ पंतने सोशल मीडियावर शेअर केली ही पोस्ट

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने आपल्या दुखापतीबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे.

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा लालबाग राजाच्या दर्शनाला : देशाच्या प्रगतीसाठी केली प्रार्थना

मुंबई : केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी रविवारी मुंबईतल्या गणेश मंडळांना भेट दिली . मुख्यमंत्री देवेंद्र