Friday, May 9, 2025

महामुंबईमहत्वाची बातमीक्राईम

अखेर परमबीर सिंग यांचं निलंबन

अखेर परमबीर सिंग यांचं निलंबन
मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्या निलंबनाची चर्चा गेले कित्येक दिवस रंगत होती आणि अखेर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी परमबीर सिंग यांच्या निलंबनाच्या फाईलवर स्वाक्षरी केली असून यासंबंधी आजच कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.

आयएएस अधिकारी देबाशिष चक्रवर्ती यांनी परमबीर सिंग यांच्यासंबंधी दाखल केलेला अहवाल महाराष्ट्र सरकारने स्वीकारला आहे. बेशिस्त वर्तणूक आणि नियमांचं उल्लंघन यामुळे परमबीर सिंग यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याआधीच परमबीर सिंग यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले होते. त्याप्रमाणे आज त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
Comments
Add Comment