नालासोपारा (वार्ताहर) : काही दिवसांपूर्वी विरारमधील ग्लोबल सिटी या परिसरामध्ये जेट्टी बंदर येथे एका महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेतल्यानंतर अखेर या खुनाचे गूढ उलगडले आहे. सदर महिलेचा खून प्रेमप्रकरणातून झाल्याचे समोर आले आहे.
विरार पश्चिमेला ग्लोबल सिटी येथे सापडलेल्या मृतदेहाचे ओळख पटली असून तिचे नाव रेश्मा खड्ये (२५) होते. रेश्मा विरार पूर्व गांधीनगर येथे राहत होती. २५ तारखेला नेहेमीप्रमाणे ती कामावर जाण्यास निघाली होती. त्यानंतर तिचा फोन लागत नसल्याने आणि दोन दिवस ती घरी परतली नसल्याने २७ तारखेला तिची बेपत्ता असण्याची तक्रार तिच्या घरच्यांनी विरार अर्नाळा पोलीस ठाण्यात नोंदवली. या तक्रारीच्या आधारे शोध घेतल्यानंतर तिचा मृतदेह सापडला.
रेश्मा नोकरी करत होती. गेल्या अनेक महिन्यांपासून हर्षल पाटील हा तरुण तिला छळत होता. काही महिन्यांपूर्वी रेश्माचे लग्न हर्षल याच्याशी लावून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता; परंतु काही कारणास्तव लग्न तुटले होते.