मुंबई नगरी बडी बाका, जशी रावणाची दुसरी लंका …
वाजतो गं डंका, डंका चहुमुलुखीं
श्रीमंतीच्या बाबतीत रावणाच्या लंकेशी बरोबरी करणारी मुंबई, ही देशाची आर्थिक राजधानी आहे, त्यामुळे देशविदेशात मुंबईच्या नावाचा डंका नेहमीच वाजत राहतो. साहजिकच परदेशी पाहुण्यांची आणि उद्योजकांची इथे रेलचेल असते. संविधानिक पदावरील व्यक्तींच्या स्वागताचा मान मुंबईच्या महापौरांचा असतो. साहजिकच मुंबईच्या महापौरांना मंत्र्याप्रमाणे सन्मान मिळतो. आशिया खंडातील सर्वात मोठी आणि श्रीमंत महापालिका म्हणून मुंबईचा लौकिक आहे. मुंबई महापालिकेचे आर्थिक बजेट हे एका राज्याच्या बजेट एवढे म्हणजे सुमारे ४० हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. म्हणून मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच पक्ष नेटाने प्रयत्न करीत असतात. अशा या मुंबई महापालिकेत गेली २५ वर्षे शिवसेना सत्तेत असून ४० हजार कोटींच्या तिजोरीच्या चाव्या शिवसेनेच्या ताब्यात आहेत. शिवसेनेची ताकद किंवा शिवसेनेला रसद पुरविण्याचे काम मुंबई महानगरपालिका करत आली आहे. गेली २५ वर्षे मुंबईवर शिवसेनेची एकहाती सत्ता राहिली आहे.
मात्र २०१७च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत कडवी टक्कर देत भाजपने शिवसेनेसमोर कडवे आव्हान उभे केले. शिवसेनेला ८४ जागांवर रोखत भाजपने ८२ जागांपर्यंत मजल मारीत मुंबईच्या सत्तेच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न केला. कदाचित राज्यातील राजकीय समीकरण बिघडू नये, म्हणून भाजपने आकड्यांची जुळवा-जुळव करून सत्ता काबीज केली नाही. तसेच शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देत विरोधीपक्ष नेतेपदही नाकारले. तरी आपण सत्तेच्या जवळ पोहोचलो असून भविष्यात सत्तेच्या चाव्या मिळवू शकतो, हा संदेश मात्र शिवसेनेला दिला.
सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीने राज्यातील राजकीय समीकरण पुन्हा नव्याने बनली आहेत. शिवसेना आणि भाजपचा काडीमोड झाला असून २५ वर्षांची युती तुटली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन शिवसेनेने राज्यात सत्ता स्थापन केली. एकत्र निवडणूक लढवून आणि सर्वाधिक जागा जिंकूनही सत्तेपासून दूर राहिलो, याचे शल्य भाजपला नक्कीच आहे. म्हणूनच शिवसेनेची मुख्य ताकद असलेली मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.
मुंबई महापालिकेची फेब्रुवारी २०२२ मध्ये निवडणूक येऊ घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर नासा ग्लोबल मीडिया आणि श्री मीडिया रिसर्च प्रा. लि. या संस्थांनी संयुक्तपणे शास्त्रोक्त राजकीय सर्वेक्षण केले आहे. मुंबईतील २२७ वॉर्डमध्ये रॅन्डम सॅम्पल सर्व्हे करून मतदारांच्या मनाचा कौल अजमाविण्यात आला आहे. प्रत्येक वॉर्डमधील समाज रचना, संभाव्य उमेदवारांचे कार्य, राजकीय पक्षाचा प्रभाव, उमेदवाराविषयी पसंती किंवा नाराजी या बाबींचा अभ्यास करून अहवाल मांडण्यात आला आहे. प्रत्येक वॉर्डात ३० ते ३५ सॅम्पल प्रत्यक्ष मतदारांचे घेतले आहेत. साधारण ७ हजार २०० सॅम्पल प्रत्यक्ष मतदारांचे घेतल्यानंतर हा सर्व्हे सादर करण्यात आला आहे. या सर्व्हेनुसार भाजपची सरशी होताना दिसत असून भाजप ९३ जागा जिंकणारा सर्वात मोठा पक्ष ठरेल असे दिसते, तर शिवसेना ८५ जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरेल. काँग्रेस २८, राष्ट्रवादी ७, मनसे ४, समाजवादी पक्ष ६, एमआयएम २, अखिल भारतीय सेना १ आणि इतर १ जागेवर विजयी होईल, असे दिसते. मात्र सर्वात मोठा पक्ष झाला तरीही भाजप मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या आपल्याकडे घेईल का, याबाबत साशंकता आहे.
पुन्हा एकदा राज्यातील राजकीय समीकरणांचा विचार करता महाविकास आघाडीचा प्रयोग मुंबई महापालिकेत होण्याची शक्यता जास्त आहे. राजकीय परिस्थितीचा अभ्यास करून त्यानुसार मोर्चेबांधणी करत निवडणूक लढण्यात भाजपचा हातखंडा आहे. सन २०१७च्या निवडणुकीत १ ते ५ टक्के मतांच्या फरकाने ५१ वॉर्डमध्ये, तर ५ ते १० टक्के मतांच्या फरकाने ५४ वॉर्ड्समध्ये जय किंवा पराजयाचा डाव रंगला. हे अत्यंत चुरशीची लढत झालेले १०५ वॉर्ड्स २०२२च्या निवडणुकीत सत्तेचा डाव पलटवू शकतात. या सर्वेक्षण अहवालानुसार अटीतटीची लढत झालेल्या १०५ वॉर्डमध्ये दोन्ही पक्षांनी मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे हे ‘१०५ गेम चेंजर वॉर्ड्स’ आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न दोन्ही पक्ष करताना दिसत आहेत. त्यासाठी या गेमचेंजर वॉर्डमध्ये भाजप आपली पूर्ण ताकद पणाला लावून सत्तेच्या चाव्या आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मागील निवडणुकीत ‘कांटे की टक्कर’ देत शिवसेनेच्या नाकी दम आणणारा भाजप २०२२ मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला मागे टाकीत सर्वाधिक मोठा पक्ष बनताना दिसतो. नासा ग्लोबल मीडिया आणि श्री मीडिया रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड या दोघांनी मिळून केलेल्या सर्व्हेनुसार मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरेल, असे दिसते. जरी मुंबई महापालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता आली तरी भाजपने शिवसेनेपेक्षा जास्त जागा जिंकणे ही सुद्धा एक प्रकारे शिवसेनेसाठी मोठी हार ठरू शकते.
(लेखिका नासा ग्लोबल मीडियाच्या संस्थापक आहेत)
nassaglobal21@gmail.com
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…