Tuesday, June 17, 2025

आ. नितेश राणे यांचा शिवसेनेला जोरदार धक्का

आ. नितेश राणे यांचा शिवसेनेला जोरदार धक्का

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत भाजपने सेनेला जोरदार धक्का दिला. सेनेच्या महिला शहर पदाधिकारी सुंदराबाई निकम यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतले आहे.


आमदार नितेश राणे यांनी सर्व प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.


प्रभाग क्रमांक १० चा संपूर्ण गड आमदार नितेश राणे यांनी सर केल्याने शिवसेनेचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.


प्रवेश करणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते दिवेश गजोबार, रणजित निकम, प्रसाद गजोबार, सुमित निकम, समीर गजोबार, अंकित गजोबार, दीपक धोंडू गजोबार यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.


यावेळी भाजप पक्ष निरीक्षक संदेश ऊर्फ गोट्या सावंत, भाजप तालुकाध्यक्ष नासीर काझी, बंड्या मांजरेकर, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >