Wednesday, April 30, 2025

महामुंबईताज्या घडामोडीठाणे

‘त्या’ रुग्णासोबत आणखी एक डोंबिवलीकर

‘त्या’ रुग्णासोबत आणखी एक डोंबिवलीकर

डोंबिवली (वार्ताहर) : दक्षिण आफ्रिकेहून आलेल्या रुग्णासोबत विमानात ४२ सहप्रवासी होते. या ४२ सहप्रवाशांमध्ये आणखी एक प्रवासी डोंबिवलीमधील असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, या ५० वर्षीय प्रवाशाची कोरोना टेस्टिंग होणार असून केडीएमसीकडून त्याला क्वारंटाइन करण्यात आले आहे.

तसेच या प्रवाशाची प्रकृती स्थिर असल्याचे केडीएमसीच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान कोरोना टेस्टिंगनंतर या ५० वर्षीय प्रवाशाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जाणार असल्याचे केडीएमसी आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

दक्षिण आफ्रिकेहून आलेल्या ३२ वर्षीय रुग्णाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर केडीएमसी प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले असून अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही. सध्या या रुग्णाला महापालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

केडीएमसीकडून त्याच्या कुटुंबीयांची देखील टेस्टिंग करण्यात आली असून त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान या ४२ प्रवाशांची यादी केडीएमसीने शासनाला दिली असून ज्या भागात प्रवासी राहतात, त्या त्या महापालिकेकडून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे.

Comments
Add Comment