Monday, May 5, 2025

क्रीडा

धोनी, कोहलीला कायम ठेवणार?

धोनी, कोहलीला कायम ठेवणार?

नवी दिल्ली : आयपीएलच्या आगामी हंगामासाठी आठ संघांपैकी ७ संघांनी आपल्या खेळाडूंना रिटेन केले नसल्याचे समजते. पंजाब किंग्स आपल्या जुन्या खेळाडूंला रिटेन करणार नसल्याचे समजते.

क्रीडाविषयक वेबसाइटने याबाबत माहिती दिली आहे. धोनी, कोहली आणि विल्यमसन या दिग्गज खेळाडूंना त्यांच्या संघाकडून रिटेन करणार असल्याचे समजते.

क्रीडाविषयक वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार धोनी, कोहली आणि विल्यमसन या दिग्गज खेळाडूंना त्यांचे संघ रिटेन करण्यासाठी इच्छुक अाहे. चेन्नईने रवींद्र जडेजा, महेंद्र सिंह धोनी, ऋतुराज गायकवाड, मोईन अली या खेळाडूंना चेन्नई सुपर किंग्स रिटेन करण्यासाठी इच्छुक आहे.

कोलकाता नाइट राइडर्स सुनील नरेन, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, वेंकटेश अय्यर यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवू शकते. सनराइजर्स हैदराबादने केन विल्यमसनला संघासोबत ठेवणार असल्याचे समजते. मात्र रिटेनबाबत आतापर्यंत कोणत्याच फ्रँचायजीने अधिकृत घोषणा केलेली नाही.

Comments
Add Comment