- प्रियम नाईक, सैफी हॉस्पिटल, मुंबई येथील आहारशास्त्र अधिकारी
तुम्ही जे अन्न ग्रहण करता त्याने तुमच्या आरोग्यावर मोठा फरक जाणवतो. चांगली जीवनशैली राखण्याबरोबरच विविध पद्धतिचे जेवण घेणे, सात्विक आहार ठेवणे फार गरजेचे आहे, जो तुमच्या आरोग्यात चांगला बदल आणणारा एक मार्ग आहे.
सात्विक आहार म्हणजे काय?
सात्विक शब्द ‘सत्व’ शब्दाने बनला आहे जो शुद्धि, उर्जा, स्वच्छता आणि सशक्तता असे सूक्ष्म पोषक तत्वांनी अत्यंत समृद्ध असा मानला जातो. सात्विक आहारात रेशेयुक्त खाद्यपदार्थांचा समावेश अधिक असतो, कमी चरबीयुक्त शाकाहारी आहार जो योगा आधारित जीवनाचे तत्वज्ञान सांगतो, हल्का, आरोग्यवर्धक असतो, सात्विक आहारात स्वच्छता आणि शारीरिक शक्ती, चांगले आरोग्य आणि दीर्घ जीवनावर भर दिला जातो, यात कोणत्या पद्धतिने खातो आणि आपल्या जीवनशैलीच्या सवयी कशा आहेत जेणेकरुन भावनिक संतुलन राखून टॉक्सिन (विषारी पदार्थ) ला शरीराबाहेर टाकले जाते, याने तुम्ही उर्जावान राहता आणि आनंदी, शांत राहता आणि मानसिक स्पष्टता राहते. हा तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्याचा मार्ग सुद्धा असू शकतो. नुसते अन्न नाही तर सात्विक आहार खाण्याच्या सवयी आणि संयमी राहण्यावर केंद्रित आहे, जे तेवढेच लाभदायी आहे जसे तुमचे निरामय आहार घेणे. मांसाहार, कुक्कुटपालन किंवा अंड्याचे अंश असलेले कोणतेही उत्पादन सात्विक आहारात वर्ज्य म्हणजे त्याचा पूर्ण निषेध आहे.
तीन प्रकारचे आहार
आहाराची विभागणी तीन प्रकारांमध्ये केली गेली आहे – सत्व, रजस आणि तमस
राजसिक आहाराला अतिउत्तेजक म्हटले गेले आहे, उदाहरणार्थ असे पदार्थ जे चवीष्ट असतात आणि ज्यात मसाले, कांदा, लसूण, कॉफी, चहा, साखर, तळलेले पदार्थ, फास्ट फूड येतात
असे मानले जाते की तामसिक पदार्थ खाण्याने अशक्तपणा आणि आळस जाणवतो उदा. मांस, अंडी, अति गोठलेले पदार्थ, पुन्हा-पुन्हा गरम केलेले पदार्थ, अल्कोहोल आणि शिळे अन्न.
म्हणुनच सात्विक आहाराला दीर्घ आयुष्य, बलवर्धक आणि मानसिक आरोग्य वाढविणारा सांगितला गेला आहे. खाली नमूद केलेले खाद्यपदार्थ तुमच्या सात्विक आहाराचा भाग असु शकतात ज्याचे सेवन तुम्ही आपली इम्युनिटी वाढविण्या करिता आणि आज़ारपासुन वाचण्या करिता करु शकता.
- आवळा
- अंकुरलेले संपूर्ण धान्य
- डाळी आणि शेंगा
- मध
- तूप
- भाजीपाला
- ताज्या फळांचे रस, लिंबू पाणी
- काजू आणि बिया
- हर्बल टी
- आले, हळद, काळे मिरे
- गूळ
- अपरिष्कृत साखर
- दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
पालक, गाजर, भाजी किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी उपयुक्त अशी कोणतीही वनस्पती, बटाटे, ब्रोकोली, लेट्यूस, मटार, फुलकोबी(फ्लॉवर) ही सात्विक आहारातील भाज्यांची उदाहरणे आहेत. सगळेच मूळ कंद सात्विक आहाराचा भाग नसतात. सफरचंद, केळी, पपई, आंबा, चेरी, खरबूज, पीच, पेरू इत्यादी फळे यात येवू शकतात.
प्राण्यांमधील प्रथिने, तळलेले पदार्थ, कॅफीन सारखे उत्तेजक, पांढरी साखर हे काही पदार्थ आहेत जे सात्विक आहार पद्धतीत वगळले आहेत.
सात्विक आहार हा कच्च्या भाज्या आणि सॅलडमधील पौष्टिक घटक 40 टक्के वाढविण्यास मदत करतो. आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्ये, आहारातील फायबर, अँटिऑक्सिडंट्स, प्रथिने, खनिजे आणि मोनोसॅच्युरेटेड फॅट्सने समृद्ध असल्याने, ते आपल्याला जीवनशैलीतील अनेक विकारांपासून वाचविण्यास मदत करते, जसे
- वजन कमी करण्यास मदत होते
- शरीर आणि मन संतुलित राहते
- पचनसंस्था सुधारण्यास मदत होते
- मधुमेह मेल्तिस, हृदयविकार, उच्च रक्तदाब, कर्करोग, पक्षाघात यांसारख्या घातक आजारांपासून संरक्षण
- बॉडी डिटॉक्स होण्यास मदत