Wednesday, April 30, 2025

देशमहत्वाची बातमी

‘डरपोक सरकार’

‘डरपोक सरकार’

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्यानुसार तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी सरकारने पुढचे पाऊल टाकले. यावेळी दोन्ही सभागृहांत चर्चेची मागणी करत विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून ‘डरपोक सरकार’ असा उल्लेख करत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांनी तीन कृषी कायदे रद्द करणारे विधेयक दोन्ही सभागृहांत मांडले. त्यावर विरोधकांची चर्चेची मागणी फेटाळण्यात आली. त्यावर राहुल गांधी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. संसदेत एमएसपीवर चर्चा होऊ दिली नाही. बळीराजा शहीद झाला त्याबाबत चर्चा टाळण्यात आली. लखीमपूर प्रकरणात केंद्रातील मंत्र्याला हटवण्याबाबत सरकारला काही बोलायचे नाही, अशा शब्दांत राहुल यांनी आपला संताप व्यक्त केला.

Comments
Add Comment