Sunday, October 19, 2025
Happy Diwali

मुंबईत २२ ते २८ डिसेंबरदरम्यान हिवाळी अधिवेशन

मुंबईत २२ ते २८ डिसेंबरदरम्यान हिवाळी अधिवेशन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या २२ ते २८ डिसेंबरपर्यंत मुंबईत घेतले जाणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनाला प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. तसेच  दुसऱ्या आठवड्यात २७ आणि २८ डिसेंबर, असे दोनच दिवस कामकाज होईल. याच काळात अधिवेशन वाढवायचे किंवा नाही याचाही विचार केला जाईल, असे राज्याचे संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी सांगितले.

या हिवाळी अधिवेशनात एकूण १२ विधेयके असतील. तारांकित प्रश्नांसंदर्भात गुरुवारी सभापतींकडे होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. तसेच २४ डिसेंबरला पुन्हा बैठक घेऊन अधिवेशन वाढवायचे किंवा नाही यावर निर्णय होईल. ज्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस झाले आहेत, त्यांनाच प्रवेश मिळणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा