Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

शार्दुल ठाकूरने केला साखरपुडा

शार्दुल ठाकूरने केला साखरपुडा

मुंबई (प्रतिनिधी) : भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने गर्लफ्रेंड मिताली परुळकरसोबत नुकताच मुंबईत साखरपुडा केला. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. साखरपुड्याला फक्त दोघांच्या जवळचे कुटुंबीयच उपस्थित होते. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये हा सोहळा पार पडला. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकानंतर हे दोघे लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सलग सामने खेळल्यामुळे वर्कलोड मॅनेजमेंटचा भाग म्हणून शार्दुलला बीसीसीआयने सध्या विश्रांती दिली आहे. शार्दुल भारताकडून तिन्ही प्रकारात खेळला आहे. त्याने भारतासाठी आतापर्यंत ४ कसोटी, १५ एकदिवसीय आणि २४ टी-ट्वेन्टी सामने खेळले आहेत.

Comments
Add Comment