नवी दिल्ली – संसदेवर सोमवारी काढण्यात येणारा ट्रॅक्टर मोर्चा संयुक्त किसान मोर्चाने पुढे ढकला आहे, अशी माहिती शेतकरी नेते दर्शनपाल सिंग यांनी शनिवारी दिली. सिंघू सीमेवर शनिवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पंतप्रधानांनी वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा या पुर्वीच केली आहे. त्यामुळे ट्रॅक्टर मोर्चा पुढे ढकलावा, अशी भावना अनेक संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.
सरकारने मागे घेण्याची घोषणा केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले. त्यावेळी संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर दररोज पाचशे जणांचा टॅक्टर मोर्चा काढण्याची घोषणा संयुक्त किसान मोर्चाने यापुर्वी केली होती.