
मुंबई : राज्यातील कोरना रूग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे राज्य राज्य सरकारने अनेक कोराना प्रतिबंधात्मक नियमांमध्यये शिथिलत दिली आहे.
दरम्यान, ज्या नागरिकांचे संपू्र्ण लसीकरण झालेले आहे अशाच व्यक्तींना यापुढे सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या नव्या नियमावलीत हा आदेश देण्यात आला आहे.
नव्या नियमावलीनुसार, राजकीय सभांना, जाहीर कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र नियम पाळले जात नसतील तर संबंधित आयोजकांवर 50 हजार दंड आकारण्याबरोबर कार्यक्रम बंद करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे.