Friday, July 11, 2025

शाळांचे भूखंड आता ग्रंथालयासाठी नाहीत

शाळांचे भूखंड आता ग्रंथालयासाठी नाहीत

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील शाळांसाठी आरक्षित असलेले भूखंड किंवा समायोजित आरक्षणातून मिळालेल्या इमारती आता ग्रंथालयासाठी वापरता येणार नसल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


महापालिकेच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी हे लहान घरात, वस्त्यांमध्ये राहणारे असतात. त्यामुळे तिथे त्यांना अभ्यासाला जागा मिळत नाही. कुटुंबातील सदस्यांची संख्या आणि घरातील जागा पाहता विद्यार्थी घरात अभ्यास करू शकत नाहीत. अशा वेळी अनेक विद्यार्थी उद्याने, मैदाने इथे देखील अभ्यास करताना पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिक किंवा ग्रंथालय उपलब्ध करून देणे गरजेचे असून महापालिकेच्या २०३४च्या विकास आराखड्यातही शाळांसाठी भूखंड आरक्षित ठेवण्यात आले आहेत.


दरम्यान मुंबईतील आरक्षित भूखंडापैकी काही ठिकाणी ग्रंथालये सुरू करून तेथे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची सोय करून द्यावी, असा ठराव महासभेने मार्च २०२१ मध्ये मंजूर केला होता. मात्र या ठरावाच्या सुचनेवर प्रशासनाने शिक्षण समितीत सादर केलेल्या अहवालात समायोजित आरक्षणा अंतर्गत ग्रंथालय आणि वाचनालयासाठी मिळालेल्या इमारतींमध्ये ही सोय उपलब्ध करून देण्यात येईल. मात्र, शाळेसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर अशी सोय उपलब्ध करून देता येणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा