
जालना : शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या जालन्यामधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी सकाळी छापा टाकला.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी लना येथील साखर कारखाना विक्रीत अर्जुन खोतकर यांनी १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी हा छापा टाकण्यात आला आहे.
जालन्यामध्ये शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता ईडीचा छापा पडला. खोतकर हे जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत.
सकाळी साडेआठ वाजल्यापासून ईडीचे पथक खोतकरांच्या भाग्यनगर येथील बंगल्यामध्ये होते.
१२ जणांच्या पथकाने या ठिकाणी तपासणी केली. आतमधून दरवाजे बंद केले असून कोणालाही आतमध्ये प्रवेश दिला गेला नाही. छाप्यादरम्यान अर्जुन खोतकर हे घरीच होते, अशी माहिती समोर आली आहे.