Tuesday, February 17, 2026

अर्जुन खोतकरांनी १०० एकर शासकीय जागा हडपल्याचा आरोप

अर्जुन खोतकरांनी १०० एकर शासकीय जागा हडपल्याचा आरोप

मुंबई – मागील काही दिवसांपासून शिवसेनेच्या नेत्यांमागे चौकशांचे शुक्लकाष्ट लागलं आहे. त्यात आता नवीन नाव सामील झालं असून शुक्रवारी शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीचे छापे पडले होते. आता त्यांच्यावर आणखी एक नवीन आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.

सोमय्या यांनी आधीच मनी लॉन्ड्रींग आणि जालना साखर कारखान्याच्या खरेदीवरून अर्जुन खोतकर आणि विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नीवर आरोप केले आहेत. आता त्यांनी नवीन आरोप केला असून खोतकर यांनी मॉल, कमर्शियल कॉम्प्लेक्श आणि इमारतीसाठी मुख्यमंत्र्यांच्या कृपेने १०० एकर शासकीय जागा हडपली असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन खोतकर यांच्यावर आरोप केले आहेत. यावेळी ते म्हणाले की, खोतकर यांना कारखान्याच्या जागेत मॉल तयार करायचा आहे. सरकारने जी जागा दिली होती ती साखर कारखान्यासाठी दिली होती. कारखान्याची एकूण २४० एकर जागा असून त्याची किंमत 1 हजार कोटी आहे. आता ईडीने व्यवस्थित तपास सुरू केला असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.

Comments
Add Comment