नवी दिल्ली : आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये गौतम अदानी हे पहिल्या स्थानी पोहोचले आहेत.
एप्रिल २०२० पासून अदानींच्या संपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे. १८ मार्च रोजी अदानींची संपत्ती ४.९१ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी होती. मागील २० महिन्यांमध्ये अदानींची संपत्ती १ हजार ८०८ टक्क्यांनी वाढली आहे. म्हणजेच अदानींची संपत्ती ४.९१ बिलियन डॉलरवरून ८३.८९ बिलियन डॉलरवर गेली आहे.
ब्लुमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या पूर्वीच्या अहवालानुसार अदानींची एकूण संपत्ती ८८.८ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी होती. अदानींच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आल्याने श्रीमंतांच्या यादीमधील बदल दिसून आल्याचे सांगितले जाते.