मुंबई : मुंबईसह संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. हायकोर्टाने तीन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द केली असून शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत केले आहे.
२०१३ मधील शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अंसारी यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.
या प्रकरणातील आरोपींनी फाशीच्या शिक्षेला आव्हान दिले होते. घटना घडली तेव्हा लोकांचा रोष वाढला होता. पण कायद्याचा विचार करता हे प्रकरण फाशीचे नाही, असे कोर्टाने यावेळी नमूद केले.
आरोपींनी मुंबई सत्र न्यायालयाने ४ डिसेंबर २०१४ ला या सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आव्हान दिले होते. हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली होती. आरोपींची शिक्षा निश्चित करण्यासंबंधीचा निर्णय हायकोर्टाने राखून ठेवला होता. दरम्यान गुरुवारी निर्णय सुनावताना कोर्टाने फाशीची शिक्षा रद्द केली असून शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर करण्याचा निर्णय दिला.
दरम्यान, “फाशीची शिक्षा रद्द करताना आम्ही प्रक्रियेचे पालन केले आहे,” असे कोर्टाने यावेळी स्पष्ट केले. पुढे सांगितलं की, “आरोपी जन्मठेपेच्या शिक्षेस पात्र आहेत.
काय आहे प्रकरण?
मुंबईतील महालक्ष्मी येथील शक्ती मिल कंपाऊंडमध्ये २२ ऑगस्ट २०१३ ला सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. छायाचित्रकार असणारी महिला आपल्या सहकाऱ्यासोबत फोटाग्राफी करण्यासाठी गेली होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापची लाट उसळली होती. पोलिसांनी या प्रकरणी विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अन्सारी, सिराज खान आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली होती.
शक्ती मिल सामूहिक बलात्कारप्रकरणी कोर्टाच्या निकालाचा सन्मान आहेच, पण आम्हाला पूर्ण न्यायाची अपेक्षा होती. याआधीही १९ वर्षीय तरुणीने गुन्हा नोंदवल्याची माहिती आहे, ज्यात हे आरोपी होते. आरोपी वासनांध सराईत आहेत. या नराधमांना फासावर लटकवायला हवं, सरकारनं सुप्रीम कोर्टातून न्याय द्यावा. – चित्रा किशोर वाघ, भाजप, प्रदेश उपाध्यक्ष
सोलापूर : सोलापूरकरांची (Solapur News) आतुरता असलेल्या विमानसेवेसंदर्भातील महत्वाची माहिती आता समोर आली आहे. मागील…
मुंबई : आपल्याला कधीकधी कामानिमित्त किंवा फिरायला जाताना विमान प्रवास करावा लागतो. विमान प्रवास कितीही…
इस्लामाबाद : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढण्यास सुरवात झाली आहे.…
मुंबई : सध्याचं जग हे महिला सबलीकरणाचं जग आहे. एकेकाळी फक्त पुरुषांसाठी असलेले अनेक मार्ग…
नागपुरात सर्वाधिक, तर मुंबईत केवळ १४ मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या भ्याड दहशतवादी…
बंगळुरू : आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत ४४ सामने झाले आहेत. या सामन्यांमध्ये सर्व संघांनी केलेल्या…