Monday, December 8, 2025

वानखेडेंविषयी भाष्य करण्यास मलिक यांना मनाई

वानखेडेंविषयी भाष्य करण्यास मलिक यांना मनाई

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई हायकोर्टाने नवाब मलिक यांना वानखेडे कुटुंबीयांविरोधात ९ डिसेंबरपर्यंत कोणतेही वक्तव्य करण्यास मज्जाव केला आहे.

एनसीबीचे विभागीय संचलाक समीर वानखेडे यांच्यासंबंधी रोज नवे खुलासे आणि आरोप करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना मुंबई हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. दरम्यान नवाब मलिक यांनीदेखील कोर्टाला कोणतेही वक्तव्य न करण्याची हमी दिली आहे.

समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी एकसदस्यीय खंडपीठाच्या निर्णयाविरोधात मुंबईत हायकोर्टात अपील केली होती. मानहानीच्या दाव्यात खंडपीठाने नवाब मलिकांविरोधात अंतरीम आदेश देण्यास नकार दिला होता. यानंतर ज्ञानदेव वानखेडे यांनी निर्णयाला आव्हान दिले होते.

दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना वानखेडे कुटुंबीयांविरोधात पुढील सुनावणी म्हणजेच ९ डिसेंबरपर्यंत कोणतेही वक्तव्य करू नये असं सांगितले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा