मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कोरोना रुग्णांची रोज ची आकडेवारी पाहता मुंबईत सध्या कोरोना नियंत्रणात आहे. गुरुवारी दिवसभरात मुंबईत १७९ नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७,६१,९५५ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात ४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १६ हजार ३१९ वर पोहोचला आहे.
मुंबईत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग आल्याने सध्या कोरोना नियंत्रणात आहे. दरम्यान गुरुवारी दिवसभरात १७९ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात १६२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत ७,४०,७०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईत सध्या २,३६४ सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.
दरम्यान धारावी आणि वरळी कोळीवाडा येथे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोनाने धुमाकूळ घातला होता. त्यावेळी या दोन्ही झोपडपट्ट्या हॉटस्पॉट ठरल्या होत्या. मात्र सध्या लसीकरणाला वेग आल्याने या दोन्ही ठिकाणी रुग्णसंख्या नियंत्रणात आहे.