Thursday, October 23, 2025
Happy Diwali

न्यूझीलंडचा संघ तीन फिरकीपटूंसोबत उतरेल

न्यूझीलंडचा संघ तीन फिरकीपटूंसोबत उतरेल

कानपूर (वृत्तसंस्था): भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना २५ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. कानपूरमधील ग्रीनपार्क स्टेडियमवर होणाऱ्या या पहिल्या कसोटी सामन्याबद्दल न्यूझीलंडच्या संघाच्या प्रशिक्षकांनी आपल्या संघाच्या रणनीतीबद्दल खुलासा केला आहे. न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी हे संकेत दिले आहेत की, त्यांचा संघ पहिल्या सामन्यात तीन फिरकीपटू मैदानात उतरवेल.

गॅरी स्टीड यांनी सांगितले की, भारतात येऊन कोणत्याही संघाला जिंकणे अवघड असते. पण इथे चार वेगवान गोलंदाज, एक फिरकीपटू यांना खेळवणे अवघड आहे. भारतातील खेळपट्ट्या फिरकीपटूंसाठी पूरक आहेत. म्हणूनच विदेशी संघांना इथे जिंकणे आव्हानात्मक असते. मात्र जर न्यूझीलंड तीन फिरकीपटूंसोबत मैदानात उतरला, तर मैदानाच्या परिस्थितीचा फायदा संघाला होईल.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात गुरुवारपासून मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरू होत आहे. या दोन संघांमध्ये दोन कसोटी सामने होणार आहेत. भारताने कीवींना क्लीन स्वीप देत टी-ट्वेन्टी मालिका खिशात घातली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा