नवी दिल्ली : पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कॅबिनेटच्या बैठकीत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला मार्च २०२२ पर्यंत वाढवण्यास मंजुरी मिळाली आहे.
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मार्च २०२२ पर्यंत मोफत रेशन मिळणार आहे. मार्च २०२० मध्ये ही योजना जाहीर करण्यात आली होती. सुरुवातीला, ही योजना एप्रिल-जून २०२० या कालावधीसाठी सुरू करण्यात आली होती, मात्र नंतर ती वाढवण्यात आली.
‘त्या’ निर्णयाला कॅबिनेटची मंजुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर सरकारने तीनही कृ ले पाऊल टाकले आहे. हे तीन कायदे मागे घेण्याच्या प्रस्तावाला बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.
पंतप्रधान कार्यालयाच्या शिफारशीवरून कृषी मंत्रालयाने कायदा रद्द करण्यासाठी विधेयक तयार केल्याचे सांगण्यात येत आहे. हे विधेयक संसदेत मांडले जाणार असून २९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसद हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडले जाऊ शकते.