Friday, July 11, 2025

पी. व्ही. सिंधू निवडणुकीच्या रिंगणात

पी. व्ही. सिंधू निवडणुकीच्या रिंगणात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आता निवडणूक लढवणार आहे. स्पेनमध्ये होणाऱ्या जागतिक चॅम्पियनशिप दरम्यान बीडब्ल्यूएफ अॅथलिट आयोगामार्फत घेण्यात येणारी निवडणूक सिंधू लढणार आहे.


विश्वविजेती सिंधू सध्या बालीमध्ये ‘सुपर १०००’ श्रेणीच्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा खेळत आहे. सिंधू आणि श्रीकांत यांनी ‘सुपर ७५०’ श्रेणीच्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडिमटन स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. शनिवारी या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर या दोघांनीही ‘सुपर १०००’ श्रेणीच्या इंडोनेशिया खुल्या स्पर्धेतील जेतेपदासाठी तयारी सुरू केली. बीडब्ल्यूएफ अॅथलिट आयोगाच्या निवडणुकीतील सहा पदांसाठी नामांकन भरणाऱ्या नऊ खेळाडूंपैकी सिंधू एक आहे.


बॅडमिंटन खेळासंदर्भातील आघाडीची संस्था असणाऱ्या बीडब्ल्यूएफ अॅथलिट आयोगाने एका पत्रकामध्ये, “अॅथलीट आयोग (२०२१ पासून २०२५ कालावधीसाठी) निवडणुका १७ डिसेंबर २०२१ रोजी संपूर्ण ताकदीने बिडब्ल्यूएफ विश्व चॅम्पियशनशिपसोबत स्पेनमध्ये होणार आहे.
यापूर्वी २०१७ मध्ये सिंधूने ही निवडणूक लढवली होती.


दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणारी सिंधू सध्या पुन्हा निवडणुकीला उभी राहणारी एकमेव खेळाडू आहे.

Comments
Add Comment