भारताला घरच्या मैदानावर हरवणे सोपे नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत न्यूझीलंडला धूळ चारत भारताने पाहुण्यांना व्हाईटवॉश दिला. भारताच्या धडाकेबाज विजयानंतर शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या मिचेल सँटनरने भारताचे महत्त्व अधोरेखित केले आहे. भारत हा असा संघ आहे ज्याला घरच्या मैदानावर हरवणे सोपे काम नसल्याचे सँटनर म्हणाला.

कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी - २० सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा ७३ धावांनी पराभव केला. प्रथम खेळताना भारतीय संघाने निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून १८४ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव १७.२ षटकांत १११ धावांवर गारद झाला. भारतीय संघाकडून अक्षर पटेलने तीन बळी घेतले. भारतीय संघाने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत न्यूझीलंडचा ३-० ने पराभव केला. किवी संघाला मालिकेतील एकही सामना जिंकता आला नाही आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.


मालिकेतील पराभवाबाबत सँटनर म्हणाला, “भारताने सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली. विशेषतः अक्षर पटेलचा स्पेल खूप चांगला होता. पॉवरप्लेमध्ये तुम्ही तीन विकेट गमावता तेव्हा तिथून परतणे सोपे नसते. भारतीय संघ ज्या पद्धतीने खेळला त्याचे संपूर्ण श्रेय त्याला जाते. माझ्या मते, संपूर्ण मालिकेत आम्ही त्या लयीत दिसलो नाही. भारताचा हा संघ खूप चांगला आहे आणि त्यांना घरच्या मैदानावर पराभूत करणे सोपे नाही. अनेक वेळा आम्ही मालिकेत पुढे होतो पण त्यांनी परत येऊन आमच्यावर दबाव आणल्याचे सँटनर म्हणाला.

Comments
Add Comment

पावसाच्या खेळात भारताचा दणदणीत विजय! पाकिस्तानला अवघ्या २ धावांनी लोळवले

मोंग कोक : भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमनेसामने येतात, त्यावेळी क्रिकेट चाहत्यांना रोमांचक

विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाचा विजय देशातील मुलींसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा विजय क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अनेक मुलींसाठी

विश्वचषक विजेत्या खेळाडूंसह प्रशिक्षकांचाही राज्य सरकारकडून विशेष गौरव! जेमिमा, स्मृती आणि राधा यादव यांना प्रत्येकी २.२५ कोटी!

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ जिंकून देशासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

असं चकवलं कांगारुंना, शिवम दुबेने दिली माहिती

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताने

जसप्रीत बुमराहचा पराक्रम! ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्वीन्सलँडच्या कॅरारा ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-२०

अक्षर पटेलची दमदार कामगिरी ! विराट आणि ख्रिस गेलशी बरोबरी

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना क्वीन्सलँडच्या कॅरारा ओव्हल