पणजी (वृत्तसंस्था) : केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत आणि प्रमुख चित्रपट कलाकारांनी सादर केलेल्या मनोरंजनाच्या भव्य आणि रंगारंग सोहळ्याने गोव्यातील पणजी येथे ५२व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन झाले. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतला, चित्रपटसृष्टीतील विविध रंग एकत्रित दाखवणाऱ्या या सोहळ्याचा भाग व्हा, असे आवाहन अनुराग ठाकूर यांनी केले.
भारताची कथा ही भारतीयांनी लिहिलेली आणि परिभाषित केली आहे. चित्रपट निर्मात्यांनी आपल्या देशातल्या ‘सहयोगी वैविध्यतेला आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून सिनेमॅटिक कॅलिडोस्कोपचा एक भाग बनवावे, असे अनुराग ठाकूर यांनी यावेळी सांगितले. या सोहळ्यात भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व पुरस्कार आणि सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कोरोना महामारीपासून वाढीस लागेलेले सिनेमा-आणि-ओटीटी हे समीकरण दीर्घकाळ टिकण्याची शक्यता असून ओटीटी तंत्रज्ञानाशिवाय, चित्रपट उद्योगातील सर्जनशील प्रतिभा दडपली गेली असती आणि चित्रपट उद्योगाची बाजारपेठ ठप्प झाली असती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘७५ यंग क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ या अनोख्या स्पर्धेच्या माध्यमातून युवा प्रतिभेला ओळखून मार्गदर्शन केले जाणार आहे. चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांच्या ज्यूरीने निवड केलेल्या ७५ तरुण सर्जनशील कलाकारांचे अनुराग ठाकूर यांनी अभिनंदन केले.
हेमा मालिनी यांचा गौरव
या सोहळ्यात सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांना भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व २०२१, हा पुरस्कार अनुराग ठाकूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध गीतकार आणि सीबीएफसीचे अध्यक्ष प्रसून जोशी हे या पुरस्काराचे दुसरे मानकरी असून त्यांना इफ्फीच्या समारोपाच्या दिवशी सन्मानित करण्यात येणार आहे.
सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार
आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल इस्तेवन स्झाबो आणि मार्टिन स्कॉरसेस यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मेफिस्टो (१९८१), फादर (१९६६) यासारख्या उत्कृष्ट कलाकृतींसाठी ओळखले गेलेले, गेल्या काही दशकांतील सर्व समीक्षकांकडून प्रशंसित असलेले इस्तेवन स्झाबो हे हंगेरियन चित्रपट दिग्दर्शकांपैकी एक आहेत. चित्रपट इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली दिग्दर्शकांपैकी एक दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे मार्टिन स्कॉरसेस हे नव्या हॉलीवूड युगातील प्रमुख व्यक्तींपैकी एक आहेत.
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या एच/पश्चिम विभागातील खारदांडा स्मशानभूमी पुन्हा एकदा बंद ठेवण्याची वेळ आली…
पाच रुपयांचे तिकीट दहा रुपये, सहा रुपयांचे तिकीट बारा रुपये मुंबई (प्रतिनिधी) : तोट्यात चाललेल्या…
एनटीसी गिरण्यांच्या जागेची शोध मोहीम सुरू करण्याचे म्हाडाला आदेश मुंबई (प्रतिनिधी) : गिरणी कामगारांच्या घरांच्या…
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो लवकरच होणार दाखल मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई शहरात आणि उपनगरात मेट्रोची कामे वेगाने…
पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तांवर मार्केटयार्डात मोठ्या प्रमाणात हापूस आंबा उपलब्ध…
प्रा. नंदकुमार काकिर्डे स्वित्झर्लंडस्थित आय क्यू एअर संस्थेने जागतिक पातळीवरील हवा प्रदूषणाचा व्यापक अहवाल प्रसिद्ध…