सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील आयुष दत्तप्रसाद पाटणकरने चमकदार खेळ करताना राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली आहे. नवी दिल्ली येथे भारतीय क्रीडा प्राधिकरणात (साई) झालेल्या ६४व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठीच्या निवडचाचणी स्पर्धेत छाप पाडली.
आयुष सावंतवाडी येथील मदर क्वीन हायस्कूलचा विद्यार्थी असून तो येथील उपरकर शूटिंग रेंज मध्ये नेमबाजीचे प्रशिक्षण घेत आहे. आयुष याला प्रशिक्षक कांचन उपरकर तसेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विक्रम भागले यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले आहे. यापूर्वी अहमदाबाद येथे झालेल्या प्री नॅशनलमध्ये आयुष्याने आपली पात्रता सिद्ध केली होती. डेरवण येथे झालेल्या स्पर्धेत आयुषने सुवर्णपदक तसेच वेंगुर्ला नगर परिषद परिषदेच्या स्पर्धेत एक सुवर्णपदक तसेच दोन रौप्यपदके मिळविली आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान उंचावणाऱ्या आयुष याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर, माजी राज्यमंत्री आणि आमदार रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे आमदार वैभव नाईक, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर,नगराध्यक्ष संजू परब, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, मदत घेऊन संस्थेचे अध्यक्ष किरण सावंत भोसले, शुभेच्छा देवी सावंत-भोसले, लखन राजे सावंत-भोसले, श्रद्धा सावंत-भोसले तसेच मदर किंग हायस्कूलच्या प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, सिंधुदुर्ग पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर,तालुकाध्यक्ष जितेंद्र पंडित, मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, अनारोजीन लोबो तसेच स्थानिक नेमबाजी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.