Monday, January 20, 2025
Homeदेश‘इफ्फी’मध्ये खेळाडूंना अभिवादन

‘इफ्फी’मध्ये खेळाडूंना अभिवादन

चार आंतरराष्ट्रीय क्रीडा चित्रपट होणार प्रदर्शित

पणजी (वृत्तसंस्था) : गोवा येथे २० ते २८ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत होणाऱ्या ५२व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात क्रीडा विभागात खेळावर आधारित चार प्रेरणादायी चित्रपट दाखवले जाणार आहेत. त्यात लिवेन व्हॅन बेलेनचा ‘रूकी’ (डच), जेरो युनचा ‘फायटर’ (कोरियन), मॅसीज बार्कझेव्स्कीचा ‘द चॅम्पियन ऑफ ऑशविट्झ’ (जर्मन, पोलिश) आणि एली ग्रॅपे यांचा ‘ओल्गा’ (फ्रेंच, रशियन, युक्रेनियन) या सिनेमांचा समावेश आहे.

‘रूकी’ हा चित्रपट निकी या तरुण, महत्त्वाकांक्षी आणि आत्मविश्वासपूर्ण मोटरसायकलस्वाराची कथा सांगतो. निकी रेसिंग करताना नेहमीच आपला जीव पणाला लावतो. खेळाबद्दलच्या त्याच्या साहसी आवडीचे पर्यवसान अखेरीस अपघातात होते आणि त्याचे जग उद्ध्वस्त होते. निकी पुन्हा कशी सुरुवात करतो आणि आपल्या पुतण्याला प्रशिक्षण देऊन स्वतःचे स्वप्न कसे पुन्हा जगतो हे हा चित्रपट दाखवतो. ब्रुसेल्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये ‘रूकी’चा वर्ल्ड प्रीमियर झाला.

‘फायटर’ हा उत्तर कोरियाच्या निर्वासित जीनाबद्दल आहे. ती चांगल्या जीवनाच्या शोधात सेऊलमध्ये येते. तिला तिच्या वडिलांना दक्षिण कोरियात आणण्यासाठी पैशांची गरज आहे. पण तिने कितीही मेहनत घेतली तरी दोन कोरियांमधील तणाव आणि त्यानंतर होणारा भेदभाव तिला पैशांची पुरेशी बचत करू देत नाही. बॉक्सिंग जिमच्या साफसफाईच्या कामामुळे ती बॉक्सिंगच्या जगात येते. तिथेच ती अडखळते. तरुण आणि आत्मविश्वासू महिला बॉक्सर पाहून जीनाला प्रेरणा मिळते.

दुसऱ्या महायुद्धातील खंदकांमधून शोधून काढलेली चिकाटी आणि जगण्याची एक विलक्षण वास्तविक जीवन कथा म्हणजे ‘द चॅम्पियन ऑफ ऑशविट्झ’. पोलंडचे दिग्दर्शक मॅसिएज बार्ज़ेव्स्कीच्या या चित्रपटात बॉक्सर आणि छळ छावणीतील ऑशविट्झ-बिर्केनाऊच्या पहिल्या कैद्यांपैकी एक असलेल्या टेड्यूझ ‘टेडी’ पित्र्झाइकोव्स्कीची विस्मरणात गेलेली कथा समोर आणते.

एका तरुण जिम्नॅस्टची चित्तवेधक गाथा, ‘ओल्गा’ हा दिग्दर्शक एली ग्रॅपेचा बहु-भाषिक चित्रपट आहे. स्वित्झर्लंडमध्ये निर्वासित असलेली ओल्गा, ही प्रतिभावान आणि उत्कट युक्रेनियन जिम्नॅस्ट, राष्ट्रीय क्रीडा केंद्रात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करते. ही तरुण मुलगी नवीन देशाशी जुळवून घेते. युरोपियन चॅम्पियनशिपसाठी तयारी करत असतानाच, युक्रेनियन क्रांतीने तिच्या आयुष्यात प्रवेश केला आणि सर्वकाही हादरवून टाकले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -