Sunday, November 16, 2025

विलेपार्ले येथील प्राईम मॉलला आग, २ जखमी

विलेपार्ले येथील प्राईम मॉलला आग, २ जखमी

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले पश्चिमेकडील प्राइम मॉलमधील पहिल्या मजल्यावर आज सकाळी १०. ३० वाजताच्या सुमारास आग लागली. लेव्हल ४ ची आग असून आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. अग्निशमन दलाच्या १३ गाड्या आणि ८ पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत.

या आगीच्या धुरामुळे गुदमरल्याने एका व्यक्तीला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुबासिर मोहम्मद के (२०) असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच मंगेश गावकर (५४) हे अग्निशमन दलाचे जवान देखील किरकोळ जखमी झाले आहेत, अशी माहिती कूपर रुग्णालयाच्या सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा यांनी दिली.

दरम्यान, आगीची तीव्रता पाहता इर्ला मार्केट परिसरातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा परिसर गजबजलेला असून या परिसरात अनेक दुकाने आहेत. विशेषत: इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या विक्रीसाठी हे मार्केट प्रसिद्ध आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळाली नाही.

Comments
Add Comment