Sunday, July 21, 2024
Homeताज्या घडामोडीएसटीचे खासगीकरण करण्याची अनिल परबांची धमकी

एसटीचे खासगीकरण करण्याची अनिल परबांची धमकी

मुंबई : महाराष्ट्रात सध्या एसटी कामगारांचा संप सुरु आहे. गेल्या साधारण दोन आठवड्यांपासून एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. त्यामुळे सध्या महाराष्ट्रातील लालपरी थांबलेली आहे. एसटी कर्मचारी आणि सरकार यावर काय तोडगा काढतंय, हे पाहणं निर्णायक ठरणार आहे. असं असलं तरी अद्याप यावर काहीही तोडगा निघालेला नाही. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी महामंडळाचे खासगीकरण करणार असून त्याबाबत पर्यायांची चाचपणी सुरु असल्याचे बोलून दाखवले.

परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, सध्या उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी खासगीकरण हा देखील एक पर्याय आहे. मात्र, या खासगीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा सध्या झालेली नाही. इतर राज्यांमधल्या परिवहन मंडळांचा अभ्यास करुन आपण आपल्या राज्याबाबत निर्णय घेऊ. याबाबत अधिकाऱ्यांकडून अहवाल तयार करण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

एसटी खासगीकरणाचा विचार आम्ही केलेला नाही. मात्र, वेगवेगळे जे पर्याय असतात त्यामधील एक पर्याय तो देखील असतो. मात्र, याबाबत सध्या विचार केला नाहीये. कामगार त्यांच्या भूमिकेवर अडून बसले आहेत. सरकार म्हणून लोकांची जबाबदारी जशी आमची आहे तशीच कामगारांचीही आमची आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पर्यायांचा विचार सुरु आहे, असे ते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -