Friday, June 20, 2025

तेंडुलकरच्या टी-ट्वेन्टी संघात एकही भारतीय नाही

तेंडुलकरच्या टी-ट्वेन्टी संघात एकही भारतीय नाही

मुंबई (प्रतिनिधी) : यूएईत झालेल्या जागतिक टी-ट्वेन्टी वर्ल्डकपनंतर विक्रमवीर सचिन तेंडुलकरने त्याच्या नजरेतील जागतिक टी-ट्वेन्टी संघ निवडला आहे. उपांत्य फेरी गाठणाऱ्या संघांतून टीम निवडल्याने या संघात भारताचा एकही क्रिकेटपटू नाही.


उपांत्य फेरी गाठलेल्या जगज्जेता ऑस्ट्रेलिया, उपविजेता न्यूझीलंड तसेच इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातून सचिनने त्याचा संघ निवडला आहे. विक्रमवीराने ऑस्ट्रलिया संघाच्या क्रिकेटपटूंवर अधिक विश्वास दाखवला आहे. त्याने कांगारूंच्या पाच क्रिकेटपटूंना संघात जागा दिली आहे.


सचिनच्या संघात ओपनर म्हणून डेव्हिड वॉर्नरसह इंग्लंडचा जोस बटलर आहे. बटलर हा विकेटकिपर म्हणूनही संघात आहे. सचिनने मधल्या फळीत बाबर आझम, केन विल्यमसन आणि अष्टपैलू मोईन अली यांना स्थान दिले आहे. त्याने किवींचा कर्णधार विल्यमसनला कर्णधारपद बनवले आहे. मिचेल मार्श आणि लियाम लिव्हिंगस्टोन या दोन अष्टपैलूंना फिनिशरच्या भूमिकेत ठेवले आहे. पॅट कमिन्स, जोश हॅझलेवुड, ट्रेंट बोल्ट आणि अॅडम झम्पा यांच्यावर गोलंदाजीची धुरा आहे.


सचिन तेंडुलकरचा संघ : डेव्हिड वॉर्नर, जोस बटलर (यष्टिरक्षक), बाबर आझम, केन विल्यमसन (कर्णधार), मोईन अली, मिचेल मार्श, लियाम लिव्हिंगस्टोन, पॅट कमिन्स, अॅडम झम्पा, जोश हॅझलेवुड, ट्रेंट बोल्ट.

Comments
Add Comment