Tuesday, July 1, 2025

मध्य रेल्वेवर शनिवारी आणि रविवारी पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक

मुंबई (प्रतिनिधी) : शनिवारी २० नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर रविवार २१ नोव्हेंबरला पश्चिम रेल्वेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर २० नोव्हेंबरच्या रात्री ११.४५ ते पहाटे ४.४५ पर्यंत विद्याविहार आणि कांजूरमार्ग दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गवर विक्रोळी स्थानकाच्या मध्यभागी असलेला जुना वॉरन 'एन' प्रकारचा पादचारी पूल डी-लाँच करण्यासाठी रात्रीचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे काही जलद गाड्यांवर परिणाम होणार आहे.


दरम्यान माटुंगा येथून रात्री ११.३१ वाजल्यापासून सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील उपनगरीय सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. दादर/छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या/येणाऱ्या डाउन आणि अप मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान ५व्या आणि ६व्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.


पश्चिम रेल्वेवर रविवारी २१ नोव्हेंबरला सांताक्रुज ते माहिम स्थानकादरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रूळ किंवा काही महत्त्वाच्या कामांसाठी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सांताक्रुज ते माहीम स्थानक दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गवर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान सगळ्या उपनगरीय गाड्या सांताक्रुज ते माहिम स्थानक दरम्यान धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment