Sunday, July 7, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणजामसंडे हद्दीतील नागरिकांचा घरबांधणीचा प्रश्न निकाली काढू

जामसंडे हद्दीतील नागरिकांचा घरबांधणीचा प्रश्न निकाली काढू

आमदार नितेश राणे यांचे आश्वासन

देवगड (प्रतिनिधी) : ‘देवगड-जामसंडे हद्दीतील नागरिकांचा घरबांधणीचा महत्त्वाचा प्रश्न निकाली काढू’, असा विश्वास गुरुवारी आमदार नितेश राणे यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी नगराध्यक्ष प्रियंका साळसकर, उपनगराध्यक्ष राजा वालकर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, माजी नगराध्यक्ष प्रणाली माने उपस्थित होते.

आमदार नितेश राणे यांनी यावेळी सांगितले की ‘देवगड नगर पंचायत हद्दीत तेरा घरबांधणीचे प्रस्ताव ‘सीआरझेड’साठी प्रलंबित आहेत. यासाठी समिती स्तरावर स्वतंत्र बैठक लावण्यात येणार आहे. तशी विनंती मी संबंधित अधिकारी व मंत्रालयीन पातळीवरील अधिकाऱ्यांना केली आहे. त्यामुळे त्यांचा प्रश्न सुटू शकेल. त्याचप्रमाणे इतर घरबांधणी प्रस्ताव १ डिसेंबर रोजी विशेष मेळावा लावून सोडवणूक केली जाणार आहे. त्यासाठी कोणती कागदपत्रे हवी आहेत, ती नगरपंचायतीशी संपर्क साधून नागरिकांनी माहिती घ्यावी व या मेळाव्यात यावे. तेथेच त्यांचा प्रश्न निकाली निघू शकेल. इतर प्रश्नांसाठी आपण विधानसभेमध्ये आवाज उठवू, असे आश्वासनही आमदार नितेश राणे यांनी दिले.

शिवसेनेला टोला

शिवसेनेचे तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी आमदारांनी महाराष्ट्राची चिंता करण्यापेक्षा मतदारसंघाकडे पाहावे, असे वक्तव्य केले होते. त्यावर आमदार नितेश राणे यांनी सणसणीत उत्तर दिले आहे. तुमच्या मतदार संघातील आमदाराला महाराष्ट्र ओळखतो, याचा अभिमान बाळगा. मात्र आमदार दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक पुन्हा आमदार होतील की नाही, याची तुम्ही चिंता करा, असे म्हटले आहे. आता वॅक्स म्युझियम, कंटेनर थिएटर हे उपक्रम सुरू होतील. अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -